रावेर विधानसभा निवडणूक : काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
यावल (प्रतिनिधी) :- यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी फैजपूर येथील तीर्थक्षेत्र खंडोबा महाराज मंदिर येथे प्रचाराचा गुरुवारी शुभारंभ केला. आमदार शिरीष चौधरी, काँग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष प्रदीप पवार, जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, माजी आमदार रमेश चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.
धनंजय चौधरी यांनी प्रचाराचे नारळ फोडून विधानसभा मतदार संघात प्रचाराला सुरवात केली. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक प्रल्हाद महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे, लिलाधर चौधरी, किशोर पाटील, प्रा. मुकेश येवले, हरीश गणवाणी, दिपक पाटील, गोंडू महाजन, राजु सवरने, भालचंद्र भंगाळे, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी धनंजय चौधरी यांनी सांगितले की, आम्ही आमची पिढी ही सामाजिक कार्यासाठी अखंड सेवा देणारी पिढी आहे. आता वेगवेगळ्या पद्धतीचे राजकारण करणं चालू आहे. आम्ही सकाळी उठल्यापासून आमची सुरुवातच ही रामनामाने होते तर यामध्ये हे द्वेषाचे राजकारण का करावे ? माझ्यासाठी आज तुम्ही सगळे नेते मंडळी आणि जेष्ठ एकत्र आले. मी आज एक शब्द देतो. आज मला दिलेला तुमचा प्रत्येक वेळ आम्ही सत्कारणी लावण्याचा तर प्रयत्न करेलच मात्र माझी येणारे पुढचे सगळे वर्ष ही माझ्या जनसेवेसाठी लावेल असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.