जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव एमआयडीसीतील डी सेक्टरमध्ये असलेल्या रायेटेक्स फार्मासिटीकल कंपनीत ८६ हजार ५०० रूपये सामानांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी २० जुलै रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती वरून, जळगाव एमआयडीसीतील सेक्टर-डी मध्ये रायेटेक्स फार्मासीटीकल कंपनी आहे. या कंपनीच्या स्टोअर रूममध्ये कंपनीचा काही सामान ठेवला जातो. दरम्यान ७ जुलै ते २० जुलै दरम्यान स्टोअर रूम बंद असतांना अज्ञात चोरट्याने मागील शटर उचकावून एचपी पाण्याची मोटार व वस्तू असा एकुण ८६ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. हा प्रकार घडल्यानंतर मालक प्रशांत दिलीपकुमार कोठारी (वय-५०) रा. विसनजी नगर, जळगाव यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुरूवारी २० जुलै रोजी रात्री १० वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहे.