जळगाव (प्रतिनिधी ) ;-तालुक्यातील एका महाविद्यालयीन मुलीला आमिष दाखवून तिच्यावर इंदौर,प्रीतमपूर आदी ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी सागर सपकाळे नामक युवकावर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील एका गावात २१ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. जळगाव शहरातील एका महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे. तरूणीच्या चुलत भावाच्या लग्नात सागर सपकाळे या तरूणाशी ओळख झाली होती. त्यानंतर तरूणीचे महाविद्यालयात परिक्षा सुरू असतांना ३ जुन रोजी महाविद्यालयात परिक्षा देण्यासाठी गेली होती. त्यावेळी महाविद्यालयाच्या बाहेर सागर सपकाळे हा दुचाकी घेवून थांबलेला होता. दरम्यान तरूणीचा पेपर सुटल्यानंतर तिला काहीतरी फूस लावून दुचाकीवर बसवून घेवून गेला. लक्झरीमध्ये बसवून तिला इंदौर आणि प्रितमपूर येथे लॉजवर नेवून अत्याचार केला. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर पिडीत तरूणीने जळगावात येवून नातेवाईकांसोबत तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तरूणीच्या फिर्यादीवरून १९ जुलै रोजी रात्री उशीरा संशयितआरोपी सागर सपकाळे यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे