यावल ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील हिंगोणा गावात खळयात झोपलेल्या बालकास विषारी सापाने दंश केल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. दरबार बिरलाल बारेला (वय-९) रा. हिंगोणा तालुका यावल असे मयत मुलाचे नाव आहे.
दरबार बारेला हा मुलगा मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबा सोबत हिंगोणा गावाजवळील वसंत परदेशी यांच्याकडे कुटुंब शेतीकामास असल्याने खळयात राहात होते. दरम्यान दिनांक २० जुलै गुरूवार रोजी रात्रीच्या सुमारास खळयात झोपेत असतांना त्याला उजव्या हाताच्या पाठीमागे विषारी सापाने दंश केल्याने तो जागीच मरण पावल्याची दुदैवी घटना घडली असुन ,या बाबत मयत बालकाच्या नातेवाईवाईकांनी पोलीसात खबर दिल्याने फैजपुर तालुका यावल येथे पोलीस स्टेशनला खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरबार बारेला या बालकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी केले. घटनेचा पुढील तपास फैजपुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश वाघमारेंच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राजेश बऱ्हाटे हे करीत आहे.