चोपडा (प्रतिनिधी ) – शहरातील एका घरातील खिडकीचे गज कापून आत प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चोपडा पोलीस स्टेशनला चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती वरून, व्यापारी असलेले ज्ञानेश्वर कुंवर (वय -४२) चोपड्यातील रामकुंवर नगर मध्ये राहतात. २२ जुलै च्या पहाटे त्यांच्या घरात अज्ञात चार चोरट्यांनी खिडकीचे गज कापून आज प्रवेश करून लोखंडी कपाटातील ४७ हजाराची रोकड, साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे टोंगल , २१ हजाराची सोन्याची अंगठी, अठरा हजारांचे सोन्याचे कानातील टॉप, घड्याळ असा एकूण एक लाख ४६ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला याप्रकरणी ज्ञानेश्वर कुमार यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अनोखी चार इस्मानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहे.