यावल (प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील एका गावात एका २७ वर्षीय मुलीला लॉजवर नेऊन अनेक वेळा अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या याप्रकरणी यावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावल तालुक्यातील डांभुर्णी या गावातील एका २७ वर्षीय तरुणी गावातील एका तरुणासोबत शेतीकामासाठी जवळच्या शेतात नियमित जात होती त्यामुळे तिची ओळख तरुणासोबत चांगलीच वाढली तरुणाने तरुणीस पैशाचे खोटे आमिष दाखवून संशयित आरोपीने तरुणीस डांबुर्णी येथून सावदा येथे बोलवून त्यानंतर त्याच्या दुचाकी वर दिनांक १५ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास तिला दुचाकीने ओंकारेश्वर येथून बडवाह येथील एका लॉज मध्ये नेऊन त्या ठिकाणी तरुणीवर बळजबरी करीत तीच्या मनाविरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात दिनांक २२ जुलै रोजी तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे हे करीत आहे.