पाचोरा (प्रतिनिधी ) – एका दारुड्या बापाने आपल्याच सोळा वर्षीय मुलीचा अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केल्याची घटना पाचोरा तालुक्यात घडली असून या प्रकरणी नराधम बापाविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दारुड्या बापाला अटक केली आहे
मिळालेल्या माहितीवरून, पाचोरा तालुक्यातील एका खेड्यात १६ वर्षीय पिडीत मुलगी ही आपल्या आई मयत असल्याने दोन भावांसह आजीसोबत बापाकडे राहत असून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अकरावीत पाचोरा कॉलेजला शिक्षण घेत आहे. एप्रिल महिन्यात बापाने मुलीला व त्याच्या आईला अश्लील शिवीगाळ करीत मुलीशी गैरवर्तन केले असून तसेच जून महिन्यात देखील बापाने पिडीतेस एकांतात गाठून अश्लील शिवीगाळ करीत विनयभंग केला आहे. वडील दारूच्या नशेत पिडीतेचा छळ करीत असल्याने शनिवारी पाचोरा पोलीस स्टेशनला पीडित अल्पवयीन मुलीने आजीला घेऊन बापाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात बापाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवून बापाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे हे करीत आहे.