भुसावळ (प्रतिनिधी):-भुसावळ तालुक्यात रेल्वे अपघातात एका अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे खांब क्रमांक ४५१/१३ ते ४५१/१५ दरम्यान ही व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.











