अमळनेर शहरातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी):- बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडल्याने ३८ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना अमळनेर येथे घडली आहे.
गणेश धगन राठोड (वय ३८, रा. सारवे, ता. पारोळा) असे मृत कामगाराचे नाव आहे. ते अमळनेर येथे सेंट्रिंगचे काम करत होते. काम सुरू असताना उंचावरून खाली पडल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती.
त्यांना प्रथम स्थानिक रुग्णालयात आणि नंतर पुढील उपचारासाठी धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.











