चोपडा (प्रतिनिधी):- तालुक्यातील चोपडा ग्रामीण भागात एका २५ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

मृत तरुणाचे नाव भारत भगवान राठोड (वय २५, रा. लोणजे, ता. चोपडा) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाला अज्ञात कारणामुळे गंभीर अवस्थेत चोपडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार, मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अकस्मात मृत्यू (ADR) म्हणून नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी BNSS Act कलम 194 अन्वये नोंद करण्यात आली आहे.









