• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चिन्या जगताप हत्याकांड प्रकरणी दोघांना अटक, एक दिवस कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 15, 2023
in Uncategorized
0
चिन्या जगताप हत्याकांड प्रकरणी दोघांना अटक, एक दिवस कोठडी

जळगाव कारागृहात घडली होती घटना

जेलरसह दोघं फरारांना अटक होण्याची शक्यता वाढली

जळगाव (प्रतिनिधी) – राज्याच्या कारागृह प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या २०२० सालच्या जळगाव जिल्हा कारागृहातील चिन्या उर्फ रविंद्र जगताप हत्याकांडाच्या गुन्ह्यातील संशयितांपैकी फरार असलेल्या अरविंद पाटील व अण्णा काकड यांना अखेर दोन वर्षांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, तुरुंगधिकारी जितेंद्र माळी, कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत अशी या संशयित आरोपींची नावे आहेत . ११ सप्टेंबर २०२० रोजी जिल्हा कारागृहात संशयितांनी केलेल्या जबर मारहाणीत चिन्या उर्फ रवींद्र जगतापचा मृत्यू झाला होता . कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, तुरुंगधिकारी जितेंद्र माळी, कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत यांनी मारहाण केल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत चिन्या जगताप यांची पत्नी मीना जगताप यांनी केले होते. त्यांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि नशिराबादच्या पोलीस निरीक्षकांना गुन्हा नोंदवावा म्हणून निवेदन दिले होते. त्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्यात तत्कालीन कारागृह अधीक्षकांसह ४ कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

मात्र संशयितांना अटक झालेली नव्हती. पोलीस दाद देत नाहीत हे लक्षात आल्यावर मीना जगताप यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेतली होती. मयत चिन्याचा शवविच्छेदन अहवाल आणि व्हिसेरा अहवालात त्याच्या शरीरावर मारहाणीच्या २२ जखमा असल्याचे नमूद आहे . यासंदर्भात तत्कालीन तुरुंग रक्षक मनोज जाधव यांनी २६ नोव्हेंबर २०२१ रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला होता.  कारागृह कायद्यानुसार ही घटना गंभीर असून पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यांनंतरच्या ४८ तासांच्या आत या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करायला हवा होता मात्र तसे झाले नाही. आता १४ महिन्यांनी  गुन्हा दाखल झाला होता. तर पेट्रस गायकवाड याचे निलंबन झालेले आहे.

त्यानुसार आता दाखल गुन्ह्यात फरार आण्णा किसन काकड (वय ५३, पानेवाडी, मनमाड), अरविंद प्रकाश पाटील (वय ३८, रा. चाळीसगाव) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर एक संशयित आरोपी दत्ता खोत हा जामिनावर आहे. मुख्य संशयित आरोपी कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, तुरुंग अधिकारी जितेंद्र माळी हे अद्यापही फरार आहेत. तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल करीत आहे. दरम्यान, फरार दोघांना अटक झाल्यामुळे न्याय मिळण्याची अपेक्षा आणखी वाढली असून पोलिसांनी निष्पक्षपणे तपास केल्यास दोघा प्रमुख संशयित आरोपींनाही अटक होऊ शकते, अशी माहिती मयत रविंद्र उर्फ चिन्या जगताप यांच्या पत्नी मीना जगताप यांनी दिली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/chinya-jagtap-htyakand/
Previous Post

गावठी पिस्तूल, काडतुसांसह हद्दपार आरोपी गजाआड

Next Post

डिव्हायडरला धडक बसल्याने खाजगी बसचा भिषण अपघात : दोघांचा मृत्यू, ८ जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डिव्हायडरला धडक बसल्याने खाजगी बसचा भिषण अपघात : दोघांचा मृत्यू, ८ जखमी

डिव्हायडरला धडक बसल्याने खाजगी बसचा भिषण अपघात : दोघांचा मृत्यू, ८ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार
1xbet russia

पंचकर्म उपचार सुविधा ; डॉ. पूनम सुरवाडे यांची सेवा उपलब्ध

June 12, 2026
मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार
1xbet russia

मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार

June 12, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

बालमजुरीचा पर्दाफाश; दोन गॅरेज चालकांवर गुन्हे

June 12, 2026
कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या
1xbet russia

कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार

पंचकर्म उपचार सुविधा ; डॉ. पूनम सुरवाडे यांची सेवा उपलब्ध

June 12, 2026
मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार

मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon