भुसावळ (प्रतिनिधी) :- विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, भुसावळ येथे दि. ९ नोव्हेंबर रोजी विभागातील सर्व ट्रॅकवुमनसाठी अग्रज्योती चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. विभागामध्ये प्रथमच अशा प्रकारचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे व उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली व कामादरम्यान काळजीपूर्वक व दक्ष राहून काम करण्याच्या सूचना केल्या.
ट्रॅक वूमनच्या वैयक्तिक आणि कामाशी संबंधित समस्या ऐकल्या आणि त्या सोडवल्या. परिसंवादात विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) कौशलेंद्र कुमार, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.एस. काजी, वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) तरुण दंडोतिया, वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी कलेश्वर भगत, इतर अधिकारी व ट्रॅक वूमन उपस्थित होते. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, मध्य रेल्वे महिला संघटनेतर्फे उपस्थित ट्रॅकवुमनना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी व्ही. एस. वडनेरे यांनी केले. परिसंवाद यशस्वी करण्यासाठी कार्मिक विभाग, अभियांत्रिकी विभाग, एस. अँड टी विभागाने प्रयत्न केले.