अमळनेर(प्रतिनिधी ) ;--नंदुरबार पॅसेंजवर दगडफेक करण्यात आली आहे. ट्रेनची साखळी खेचून तब्बल अर्धा तास ही दगडफेक करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अमळनेरजवळ ही खळबळजनक घटना घडली .
सुदैवाने या घटनेत ट्रेनमधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. पण या घटनेनंतर प्रवासी प्रचंड धास्तावले होते. रेल्वे रुळाच्या आजू बाजूला जमले असून ते रेल्वेवर दगडफेक करत होते. यावेळी प्रवाशांनी घाबरुन आरडाओरड केली.दरम्यान या दगडफेकीची चौकशी रेल्वेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सुरु केली आहे.