बारी समाज माध्यमिक विद्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील जयंती उत्साहात साजरी
शिरसोली (प्रतिनिधी) : शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयात सोमवार (दि. ३ ऑगस्ट) रोजी स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक सुनील भदाणे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या राष्ट्रप्रेम, संघर्षमय जीवन आणि प्रेरणादायी विचारांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. आर. धांडे यांनी केले.
कार्यक्रमाला शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख जी. बी. काळे उपस्थित होते. दीपाली पाटील यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.









