शिरसोली (प्रतिनिधी) – येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी माहितीचा अधिकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रभारी पर्यवेक्षक श्री. एस. ए. भदाणे सर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. एन. ए. अकोले यांनी केले. यावेळी माहितीचा अधिकार कायदा, त्याचे महत्त्व तसेच नागरिकांना उपलब्ध असलेल्या माहितीच्या अधिकाराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती डी. के. पाटील, श्री. आर. एस. अस्वार, श्री. एम. पी. पाठक यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








