जळगावातील आशादीप वसतिगृहात उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : बकरी ईद सणानिमित्त सोमवारी दि. १७ जून रोजी आशादीप महिला वस्तीगृहात मुस्लिम मनियार बिरादरीने तेथील मुलींशी पालक म्हणून संवाद साधला. त्यांचेसोबत बसून मिठाई खाऊ घातली. त्यांच्या वैयक्तिक अडचणी ऐकून घेत वसतिगृहासाठी किचनला लागणाऱ्या वस्तू – त्यात दोन कुकर व दोन कढईसह आंघोळीसाठी गरम पाणी मिळावे म्हणून गिझरची व्यवस्था मुस्लिम मनियार बिरादरीतर्फे करण्यात आली.
आशादिपच्या अधिक्षिका श्रीमती मयुरी करपे, रेक्टर आरती मोरे, सोनिया देशमुख, संतोषी करोसिया यांनी या भेट वस्तू स्वीकारल्या. त्या वेळी मनियार बिरादरीचें अध्यक्ष फारूक शेख, आशादिपच्या सल्लागार सदस्य निवेदिता ताठे, अब्दुल रऊफ, रफिक वायरमन, मुजाहीद खान, साबीर सैयद, सलीम शेख, सलमान खान आदींची उपस्थिती होती. यावेळी काही पुस्तके देखील भेट देण्यात आली.