अयोध्या (वृत्तसंस्था ) ;- अयोध्येत आलेल्या चार कुटुंबातील १५ जण शरयू नदीत आंघोळ करतांना बुडाले. यामध्ये तीन जणांना वाचवण्यात आले. पोलीस स्थानिक लोकांच्या मदतीने बुडलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. आग्रा येथील ४ कुटूंबातील १५ लोक अयोध्या धाम येथे दर्शनासाठी आले होते. गुप्तार घाटात ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बुडालेल्या लोकांचा शोध घेण्यास सांगितले आहे.
तेथे उपस्थित प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, पाण्याच्या प्रवाहामुळे प्रथम दोघे जण वाहून गेले आणि त्यानंतर एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात ते सर्व जण नदीत वाहून गेले.
यावेळी ६ वर्षांच्या मुलीसह तीन लोकांना वाचवण्यात आले आहे. यात ६ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे, तर चार जणांचा शोध सुरू आहे. आग्राच्या संपूर्ण कुटुंबाला वाचवण्यासाठी सैन्याची बचाव दलही नदीत खाली उतरले आहेत.