भुसावळ शहरातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील एका परिसरात राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला बंदुकीचा धाक दाखवून सबको लाईन से मार डालुंगा अशी धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की भुसावळ तालुक्यातील एका गावात पंधरा वर्षीय तरुणी शिक्षण घेत असून 2021 ते 2023 दरम्यान आरोपी अजय गिरधारी गोडाले रा.भुसावळ याने पीडित तरुणीला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा प्रकार जुलै 2021 ते 21 जुलै 2023 दरम्यान केला. यात पीडीतेला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी सुद्धा आरोपीने दिली याप्रकरणी पीडितेने बाजारपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून आरोपी अजय गिरधारी गोड आले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये करीत आहे.