अल्पवयीन मुलीचा बालविवाह; अत्याचारप्रकरणी चौघांना अटक


एरंडोल तालुक्यातील घटना; कासोदा पोलिसांची कारवाई
एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिचा विवाह कमलाकर रमेश भिल याच्यासोबत लावून देण्यात आला. विवाहानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याने ती गर्भवती झाली. त्यानंतर ६ ऑगस्ट २०२६ रोजी तिने एका नवजात बालकाला जन्म दिल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच पॉक्सो कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात दिलीप देवचंद गोकुळ, कमलाकर रमेश भिल, रमेश कौतिक भिल आणि सासू नबाबाई भिल यांना पोलिसांनी आरोपी केले असून, २० ऑगस्ट रोजी पहाटे १२.५५ वाजता चौघांना अटक करण्यात आली.
प्रकरणाचा पुढील तपास कासोदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत अंकुश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.









