
धन्यवाद गिरीश भाऊ धन्यवाद माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत जी धीवरे
जळगाव (प्रतिनिधी) मुदतीपूर्वी जन्मलेल्या नवजात बाळाला तातडीने उच्चस्तरीय उपचार मिळावेत, यासाठी जळगाव पोलिसांनी रुग्णालयापासून विमानतळापर्यंत ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार केला. पोलिसांनी रुग्णवाहिकेसाठी मार्ग मोकळा ठेवला, तर विमानतळ पथकाने एअर ॲम्ब्युलन्सच्या उड्डाणासाठी आवश्यक समन्वय साधला. या संयुक्त प्रयत्नांतून बाळाला पुढील उपचारांसाठी सुरक्षितपणे हैदराबादला पोहोचवण्यात आले.
जळगावचे व्यावसायिक रवी लड्डा यांच्या नात श्रद्धा रुपम लड्डा यांची मुदतीपूर्वी प्रसूती झाली. नवजात बाळावर डॉ. खडके यांच्या विश्वेश बाल रुग्णालयात उपचार सुरू होते. बाळाला उच्चस्तरीय नवजात अतिदक्षता उपचारांची गरज असल्याने हैदराबाद येथील किंग्स रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली.
प्रत्येक मिनिट महत्त्वाचे, पोलिसांचा चोख बंदोबस्त
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलीस आणि वाहतूक शाखेने रुग्णवाहिकेच्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला. संदीप गावित, पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, नगरसेवक अरविंद देशमुख वाहतूक शाखेचे गांगुर्डे आणि पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांनी वाहतूक नियोजन आणि बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली. मार्गावरील वाहतूक नियंत्रित केल्याने बाळाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका विनाअडथळा विमानतळावर पोहोचली.
विमानतळ पथक आणि ‘एमएसएफ’चे मोलाचे सहकार्य
जळगाव विमानतळाचे हर्षजी त्रिपाठी, ऑपरेशन इन्चार्ज कमलेश बचाव, हवाई वाहतूक नियंत्रण विभागाचे (एटीसी) नवीन आर्या अलायन्स सिक्युरिटीच्या कर्मचारी कु. अंकिता खीची आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (एमएसएफ) अधिकारी व कर्मचारी यांनी विमानतळावरील व्यवस्थेत मोलाचे सहकार्य केले. डॉक्टर, रुग्णवाहिका पथक, पोलीस, वाहतूक शाखा आणि विमानतळ कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे रुग्णालयातून सुरू झालेला चिमुकल्याचा प्रवास हैदराबादपर्यंत सुरक्षितपणे पूर्ण झाला.
धन्यवाद गिरीश भाऊ धन्यवाद माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत जी धीवरे
रवीजी लड्डा यांचा मला फोन आला. त्यांची नात श्रद्धा रुपम लड्डा यांची मुदतीपूर्वी प्रसूती झाली होती. नवजात बाळावर डॉ. खडके यांच्या विश्वेश बाल रुग्णालयात उपचार सुरू होते. पुढील उपचारांसाठी बाळाला तातडीने एअर ॲम्ब्युलन्सने हैदराबादच्या किंग्स रुग्णालयात हलवायचे होते. रुग्णालयापासून विमानतळापर्यंतचा प्रवास विनाअडथळा व्हावा, यासाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचे होते.
मी ही परिस्थिती तातडीने नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या कानावर घातली. भाऊंनी लगेच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेबांशी चर्चा केली आणि मलाही त्यांच्याशी बोलण्यास सांगितले. मी धिवरे साहेबांशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने संदीप गावित साहेबांशी माझा संपर्क करून दिला. त्यानंतर रुग्णवाहिकेसाठी मार्ग मोकळा करण्याची व्यवस्था सुरू झाली.
प्रत्यक्ष मार्गावरील नियोजनात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड साहेब यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संदीप गावित साहेब, पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर, वाहतूक शाखेचे गांगुर्डे आणि पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्यासह जळगाव पोलीस व वाहतूक शाखेच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला. त्यामुळे बाळाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका विनाअडथळा विमानतळावर पोहोचली.
जळगाव विमानतळाचे संचालक हर्षजी त्रिपाठी यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले. विमानतळाचे ऑपरेशन इन्चार्ज कमलेश बचाव, हवाई वाहतूक नियंत्रण विभागाचे नवीन आर्या, अलायन्स सिक्युरिटीच्या कु. अंकिता खीची आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एअर ॲम्ब्युलन्सच्या उड्डाणासाठी आवश्यक समन्वय साधला. डॉक्टर, रुग्णवाहिका पथक, पोलीस आणि विमानतळ कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून बाळ सुरक्षितपणे हैदराबादला पोहोचले.
रवीजींचा सकाळचा फोन आल्यापासून बाळ सुरक्षित पोहोचल्याची बातमी मिळेपर्यंत त्या कुटुंबाची काळजी मनात होती. अशा वेळी एका फोनवर तातडीने दखल घेणारे गिरीशभाऊ महाजन, क्षणाचाही विलंब न करता यंत्रणा कार्यान्वित करणारे श्रीकांत धिवरे साहेब आणि प्रत्यक्ष धावून आलेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार.










