अमळनेर ;-एका १४ वर्षांच्या आपल्या अल्पवयीन मुलीवर दीड वर्षांपासून अत्याचार करीत असल्याचा कु प्रताप समोर आला असून यामुळे शहरात संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी नराधम बापाविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर शहरातील एका भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्याला आहे. तिच्या आई व वडीलांचे भांडण झाल्यावर तिची आई बाहेरगावी निघून जात होते. त्यामुळे घरी पिडीत मुलगी आणि तिचा नराधम बाप हे दोघेच राहत होते. रात्री जेवन करून झोपल्यानंतर नराधम बापाने पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार सुरू केले. हा प्रकार तिने कुणालाही सांगितला तर तुझ्या आईला आणि तुला ठार मारेल अशी धमकी दिली. त्यामुळे पिडीत मुलीने तिच्या सोबत घडलेला प्रकार कुणाला सांगितला नाही. गेल्या दीड वर्षांपासून हा प्रकार सुरूच होता. तिची ही पिडा कुणाला सांगावे हे देखील कळत नव्हते. १८ जुलै रोजी तिची आई आणि आजी घरी आल्यानंतर त्यांनी घडलेला प्रसंग कथन केला. त्यावेळी तिच्या आई व आजीला प्रचंड धक्का बसला. त्यांनी तातडीने मुलीला सोबत घेवून अमळनेर पोलीस ठाणे गाठले. पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे करीत आहे.