जिल्हा परिषदेच्या सीईओ करनवाल यांनी पार पाडली समुपदेशनाची प्रक्रिया
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा परिषदेअंतर्गत विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य सेवक यांचा गेले अनेक दिवस रखडलेला पदोन्नतीचा प्रश्न अखेर सुटला आहे. शुक्रवार दि.९ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी स्वत समुपदेशन घेऊन २१ आरोग्य सेवकांना आरोग्य सहाय्यकपदी पदोन्नती देण्यात आली.

आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचारी यांच्या पदोन्नतीचा विषय गेले अनेक दिवस प्रलंबित होता.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जळगाव जिल्हा परिषदेत रुजू झाल्यानंतर प्रलंबित पदोन्नत्या,आणि इतर बाबींचा आढावा घेऊन पदोन्नतीचे प्रश्न निकाली काढण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व शिक्षण विभागातील पदोन्नतीचा प्रश्न गेल्या आठवड्यात मार्गी लावल्यानंतर शुक्रवार ०९ मे रोजी समुपदेशनाने जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या उपस्थितीत समुपदेशन प्रक्रिया घेण्यात आली.यात २१ आरोग्य सेवक यांना आरोग्य सहाय्यकपदी रिक्त ठिकाणी पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर आदी उपस्थित होते.