९ जागांवर महायुतीचे उमेदवार ‘कपबशी’ चिन्हावर मैदानात
जळगाव (विशेष प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत जागावाटपात भारतीय जनता पक्षाने आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीचा प्रत्यय देत २१ पैकी तब्बल १२ जागा राखण्यात यश मिळवले आहे. या निवडणुकीत १२ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून, आता उर्वरित ९ जागांवर महायुतीचे उमेदवार ‘कपबशी’ या समान चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पक्षनिहाय बिनविरोध १२ उमेदवार
बिनविरोध झालेल्या १२ जागांमध्ये महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे:
शिवसेना (६ जागा):
गुलाबराव पाटील (धरणगाव विकासो), चंद्रकांत सोनवणे (एसटी प्रवर्ग), सुमित पाटील (पाचोरा विकासो), सोमसिंग खुमानसिंग पाटील (भडगाव विकासो), मृणाल अमोल पाटील (एरंडोल विकासो), आणि नलिनी चिमणराव पाटील (पारोळा विकासो).
भाजप (४ जागा):
गिरीश दत्तात्रय महाजन (जामनेर विकासो), रजनी संजय सावकारे (भुसावळ विकासो), रोहित दिलीप निकम (चोपडा विकासो), आणि मधुकर रामचंद्र राणे (बोदवड विकासो).
राष्ट्रवादी काँग्रेस (२ जागा):
जयश्री अनिल पाटील (अमळनेर विकासो) आणि सोनल संजय पवार (धरणगाव विकासो).
रिंगणात असलेले ‘कपबशी’ चिन्हावरील उमेदवार
बिनविरोध प्रक्रिया पार पडल्यानंतर आता उर्वरित ९ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होणार असून, खासदार रक्षा खडसे, आ. मंगेश चव्हाण अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या ९ पैकी ८ जागांवर भाजपचे तर १ जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार ‘कपबशी’ चिन्हावर रिंगणात उतरले आहेत.
कपबशी चिन्हावर लढणारे ९ उमेदवार
१. यावल विकासो: विनोदकुमार पंडितराव पाटील (भाजप)
२. रावेर विकासो : राजेंद्र पंढरीनाथ चौधरी (भाजप)
३. चाळीसगाव विकासो: आ. मंगेश रमेश चव्हाण (भाजप)
४. मुक्ताईनगर विकासो: खासदार रक्षा निखिल खडसे (भाजप)
५. महिला प्रतिनिधी मतदारसंघ: माधुरी चंद्रशेखर अत्तरदे आणि पूनम प्रशांत पाटील (भाजप)
६. ओबीसी प्रतिनिधी: चंद्रकांत रामधन बाविस्कर (भाजप)
७. एनटी प्रवर्ग: सुरेश पुना धनके (भाजप)
८. इतर सहकारी संस्था मतदारसंघ: विशाल गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट)
या लढतींमध्ये जामनेर येथील भाजपचे पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या विरोधात शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील रिंगणात असल्याने ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.
भाजपची धूर्त खेळी आणि अंतिम जागावाटप चित्र
एकूण २१ जागांपैकी भाजपकडे सर्वाधिक १२ जागा (४ बिनविरोध + ८ लढतीतील), शिवसेनेकडे ६ जागा (सर्व बिनविरोध), आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे ३ जागा (२ बिनविरोध + १ लढतीतील) असे जागावाटप झाल्याचे चित्र समोर आले आहे. या संपूर्ण गणितातून भाजपच्या धूर्त खेळीचे व राजकीय नियोजनाचे चित्र स्पष्ट झाले असून, बँक निवडणुकीवर वर्चस्व मिळवण्याच्या दिशेने महायुतीने भक्कम पाऊल टाकले आहे.








