• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

महादेव हॉस्पिटलमध्ये ८० वर्षीय वृद्धावर मेंदूची अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 18, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महादेव हॉस्पिटलमध्ये ८० वर्षीय वृद्धावर मेंदूची अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव ( प्रतिनिधी ) – मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन मेंदूवर दबाव निर्माण झाल्याने गंभीर अवस्थेत असलेल्या ८० वर्षीय वृद्ध रुग्णावर महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे तातडीने करण्यात आलेली मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर दुसर्‍याच दिवशी रुग्ण पूर्णपणे शुद्धीवर येऊन प्रतिसाद देऊ लागला. तसेच अवघ्या दोन दिवसांत रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

आता रुग्ण स्वतः चालण्यासही सक्षम झाला आहे.संबंधित वृद्ध रुग्णाला अचानक शरीराच्या उजव्या बाजूला अशक्तपणा येणे, बोलता न येणे, सूचनांना प्रतिसाद न देणे तसेच स्वतःहून डोळे उघडता न येणे अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारींसह महादेव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णाची तातडीने तपासणी केली असता सीटी ब्रेनमध्ये सबअ‍ॅक्यूट सबड्युरल हेमॅटोमा म्हणजेच मेंदूच्या आवरणाखाली रक्त साचल्याचे आणि त्यामुळे मेंदूवर दबाव निर्माण होऊन मेंदू मधोमध सरकल्याचे निदान झाले.

रुग्णाची गंभीर अवस्था लक्षात घेता वेळ न दवडता आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एमसीएच न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील यांनी डाव्या बाजूला फ्रंटो-टेम्पोरो-पॅरिएटल डिकंप्रेसिव्ह क्रॅनिएक्टॉमी करून साचलेले रक्त बाहेर काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली. या शस्त्रक्रियेसाठी न्यूरोसर्जरी सिनिअर रेसिडेंट डॉ. श्रुती खंडागळेे, जनरल सर्जरी रेसिडेंट डॉ. पोमेश यांनी सहकार्य केले.

भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. ब—हाटे यांनी जबाबदारी सांभाळली.शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली. दुसर्‍याच दिवशी रुग्ण शुद्धीवर येऊन व्यवस्थित प्रतिसाद देऊ लागला. त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्याने दोन दिवसांत रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे, आता रुग्ण स्वतःच्या पायाने चालू शकत आहे.या संपूर्ण शस्त्रक्रियेचा खर्च शासकीय योजनेअंतर्गत मोफत करण्यात आला. त्यामुळे गंभीर आजारावरील अत्याधुनिक न्यूरोसर्जरीचा लाभ रुग्णाला विनामूल्य मिळाला.महादेव हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांची तत्परता, अचूक निदान, वेळेत केलेली शस्त्रक्रिया आणि समन्वयपूर्ण वैद्यकीय सेवेमुळे एका ८० वर्षीय वृद्धाला नवजीवन मिळण्यास मदत झाली.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जळगावातील शामनगरमध्ये घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने आणि १२ हजारांची रोकड लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये ८० वर्षीय वृद्धावर मेंदूची अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी
खान्देश

महादेव हॉस्पिटलमध्ये ८० वर्षीय वृद्धावर मेंदूची अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

November 18, 2026
जळगावातील शामनगरमध्ये घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने आणि १२ हजारांची रोकड लंपास
Uncategorized

जळगावातील शामनगरमध्ये घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने आणि १२ हजारांची रोकड लंपास

November 18, 2026
रांचीच्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत आकांक्षा म्हेत्रेला कांस्यपदक
जैन कंपनी

रांचीच्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत आकांक्षा म्हेत्रेला कांस्यपदक

November 18, 2026
गोदावरी फाउंडेशनच्या आयुर्वेद महाविद्यालयात नवागत विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रम उत्साहात
खान्देश

गोदावरी फाउंडेशनच्या आयुर्वेद महाविद्यालयात नवागत विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रम उत्साहात

November 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पिटलमध्ये ८० वर्षीय वृद्धावर मेंदूची अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

महादेव हॉस्पिटलमध्ये ८० वर्षीय वृद्धावर मेंदूची अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

November 18, 2026
जळगावातील शामनगरमध्ये घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने आणि १२ हजारांची रोकड लंपास

जळगावातील शामनगरमध्ये घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने आणि १२ हजारांची रोकड लंपास

November 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!