किंमत ऐकून होतील डोळे पांढरे …. !
जगातील प्रत्येक महत्वाच्या शहरांमध्ये ट्राफिक जामचा वाहनधारकांना त्रास होत असतो . मात्र बाइकप्रेमींसाठी खुशखबर असून जपानच्या एका कंपनीने जगातील हवेत उडणारी पहिली कार १५ सप्टेंबर रोजी लॉन्च केली असून तशी १०० च्या वेगाने हवेत उडत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येणार आहे. मात्र या बाईकची किंमत ७ लाख ७७ हजार डॉलर्स असून भारतीय रुपयांमध्ये ६ कोटी १८ लाख रुपये इतकी आहे. एअरविंस टेक्नॉलॉजी या जपानी स्टार्टअप कंपनीने ही बाईक बनवली आहे. १५ सप्टेंबर रोजी डेट्रॉईट ऑटो शोमध्ये तिला लाँच करण्यात आले. शो दरम्यान, तज्ञांनी या बाइकचं खूप कौतुक केलं.
डेट्रॉईट ऑटो शोचे सह-अध्यक्ष थाड स्झोट यांनी या बाईकचं कौतुक केलं. त्यांनी स्वतः या बाईकची टेस्ट केली. आपला अनुभव सांगताना ते म्हणाले की, हे खूप उत्साहवर्धक आणि आश्चर्यकारक आहे. या बाईकचे वजन ३०० किलो असून उडणारी बाईक ताशी १०० किलोमीटर वेगानं उड्डाण करू शकते. तिला बॅटरीच्या माध्यमातून पावर दिली जाते. कंपनीचं म्हणणं आहे की तिच्या लहान इलेक्ट्रिक मॉडेलची किंमत सुमारे ५० हजार डॉलर्स म्हणजेच साधारणपणे ३९ लाख ८२ हजार ५२५ रुपये असेल.
ही बाईक जपानमध्ये काळ्या, निळ्या आणि लाल रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. तिचे निर्माते २०२३ मध्ये अमेरिकेत तिची विक्री सुरू करण्याची योजना आखत आहेत.एअरविन्सने आपल्या वेबसाइटवर म्हटलं आहे की, या बाईकच्या माध्यमातून सुरक्षिततेसह उड्डाणाचा थरार अनुभवता येतो. तुम्हाला ही बाईक आवडली असेल आणि ती खरेदी करायची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुम्हाला जपानला जावे लागेल .