पाचोरा तालुक्यात नगरदेवळा येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील नगरदेवळा येथे दुचाकी घसरल्याने ३० वर्षीय तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. ९ जून रोजी दुपारी १२ वाजता घडली होती. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना सोमवारी दि. २४ जून रोजी रात्री ८ वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सुरेश साधू भोई (वय ३० रा. बेडरपूरा, नगरदेवळा ता. पाचोरा) असे मयत तरूणाचे नाव आहे. सुरेश भाई हा तरूण आईसह नगरदेवळा गावात वास्तव्याला होता. शेवमुरमुरे दुकान लावून तो उदरनिर्वाह करत होता. रविवारी दि. ९ जून रोजी दुपारी १२ वाजता दुचाकीने जात असतांना गावातच त्याची दुचाकी घसरून अपघात झाला. त्यात सुरेश हा गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे याला पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी दि. २४ जून रोजी रात्री ८ वाजता त्यांचा प्राणज्योत मालविली. या घटनेमुळे त्यांच्या आईला धक्का बसला आहे. आता घरातील कर्ता पुरूष आणि एकुलता एक मुलगा गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.