• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अटलांटा कंपनीविरोधात दुहेरी कायदेशीर लढाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 26, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा

उद्या हायकोर्ट,सुप्रीम कोर्टात निर्णायक सुनावणी

जळगाव (प्रतिनिधी) :- अटलांटा प्रकरण अधिकच गंभीर व निर्णायक वळणावर पोहोचले असून दि. २७ रोजी एकाच वेळी हायकोर्ट मुंबई आणि सुप्रीम कोर्ट दिल्ली येथे महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दि. १७ मे रोजी हायकोर्टाने जळगाव महानगरपालिकेला ११ कोटी रुपये भरण्याचा आदेश दिला होता. मात्र ऐनवेळी लोकप्रतिनिधींच्या वतीने नगरसेवक अरविंद देशमुख यांनी अ‍ॅडव्होकेट दिलीप पोकळे व अ‍ॅडव्होकेट शुचिता हाडा यांच्या माध्यमातून त्रयस्थ अर्जदार म्हणून हस्तक्षेप अर्ज दाखल केला. त्याचप्रमाणे महापौर दिपमाला काळे स्वतः न्यायालयात उपस्थित राहिल्यामुळे महानगरपालिकेला दहा दिवसांची मुदत मिळाली होती.

दरम्यान, महानगरपालिकेवर ११ कोटींचा तातडीचा भार पडू नये यासाठी सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल करण्यात आली असून, नवनिर्वाचित बॉडीच्या वतीने नगरसेवक अरविंद देशमुख हे सुप्रीम कोर्टात त्रयस्थ अर्जदार म्हणून बाजू मांडणार आहेत. हायकोर्टात अ‍ॅडव्होकेट दिलीप पोकळे व अ‍ॅडव्होकेट शुचिता हाडा हे महापालिकेची बाजू मांडणार आहेत. या कायदेशीर लढाईसाठी दोन स्वतंत्र टीम रवाना झाल्या असून, अरविंद देशमुख व विजय जगताप हे दिल्लीकडे सुप्रीम कोर्टासाठी रवाना झाले आहेत. तर अ‍ॅडव्होकेट दिलीप पोकळे, नगरसेवक हर्षल मावळे व अ‍ॅडव्होकेट शुचिता हाडा हे मुंबईकडे हायकोर्टासाठी रवाना झाले आहेत.

याचबरोबर, अटलांटा कंपनीविरोधात नगरसेवक अरविंद देशमुख यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तब्बल ४१ कोटी ३० लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत फौजदारी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत महानगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, जळगाव महानगरपालिकेचेच अटलांटा कंपनीकडे पैसे येणे बाकी असताना, संबंधित कंपनीने न्यायालयीन प्रक्रियेचा वापर करत उलट महानगरपालिकेकडून ११ कोटी रुपये वसूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाला “न्यायालयीन खेळी”चे स्वरूप प्राप्त झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

अटलांटा प्रकरणातील ही दुहेरी सुनावणी आणि फौजदारी तक्रार यामुळे प्रकरणाची व्याप्ती अधिकच वाढली असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात मोठे वळण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 

 

Tags: #jalgaon manpa news
Previous Post

शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा

Next Post

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

September 11, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

“पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास”

September 11, 2026
आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
1xbet russia

तोंडापूर येथे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

September 11, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातर्फे केळी प्रक्रिया उद्योगावर कार्यशाळा
1xbet russia

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत ९ वी १० वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

September 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

September 11, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

“पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास”

September 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon