एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव ;- शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वेगवेगळ्या दुकानाच्या ७ जणांवर एमआयडीसी पोलीसांनी कारवाई केली आहे. यासंदर्भात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यात कलम १४४ अन्वये आवश्यकतेच्या दुकाने सोडून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहे. असे असतांना एमआयडीसी हद्दीतील सात दुकानदारांवर कारवाई केली.
यांच्यावर झाली कारवाई
बॉम्बे फुट वेअरचे , हनीफ इस्माईल खाटिक (वय-५०) रा.गुलाब बाबा कॉलनी
रामभाऊ झिपरू जगताप (वय-६३) रा. मोहन नगर , भुषण ज्ञानदेव सरोदे (वय-३५) रा. काशीबाई ऊखाजी कोल्ही शाळेसमोर
अबु बकर नशीर खान (वय-४५) रा. भवानी पेठ ,राजु रंगनाथ सुर्यवंशी (वय-३०) रा. सम्राट कॉलनी , देवेंद्रसिंग दिलीप पाटील (वय-२२) रा. रामेश्वर कॉलनी
संदीप बाबुराव देशमुख (वय-२८) रा. कांचन नगर या सर्वसातही जणांवर कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ, स.फौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, पोकॉ गोविंद पाटील, इम्रान अली सय्यद, सचिन पाटील, योगेश बारी, सचिन चौधरी, मुकेश पाटील, भुषण सोनार यांनी कारवाई केली.