जळगाव ;- भोकर-भादली येथील प्रकाश गणपत पवार (वय ६०) यांचे शुक्रवारी सकाळी ९ वाजता ह्दयरोगाच्या आजाराने निधन झाले. मात्र त्यांची मुले जवळ नसल्याने मुलगी शिवसेनेच्या महिला शहर प्रमुख मनीषा पाटील यांनी अंत्यसंसकारचे सर्व सोपस्कार जळगावी पार पाडले.
शिवसेनेच्या महिला शहर प्रमुख मनीषा पाटील यांचे वडिलांना अस्वस्थ वाटू लागल्याने पाटील यांनी वडिलांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेले. मात्र, तपासणीअंती त्यांची प्राणज्योत मालवली. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने पाटील यांचे भाऊ मुंबई व गुजरात येथे असल्याने वडिलांवर अंत्यसंस्काराचा निर्णय घेत दुपारी ४.३० वाजता स्वत:च जळगावी वडिलांवर अंत्यस्कार केले.