जळगावात नवीन बसस्थानक आवारातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील नवीन बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना तरूण शेतकऱ्याच्या पॅन्टच्या खिश्यातून १ लाख रूपयांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. ५ ऑक्टोबर रेाजी दुपारी ४ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्र राजाराम मराठे (वय ३५ रा. अजंदे ता.धुळे) हा तरूण कामाच्या निमित्त्ताने शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी जळगाव शहरात आले होते. काम आटोपून दुपारी ४ वाजता ते जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात आले. त्यावेळी जळगाव-मांजरोद या बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पॅन्टच्या खिश्यातील १ लाख रूपयांची रोकड चोरून नेली. महेंद्र मराठे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिलीप पाटील हे करीत आहे.