पाचोऱ्यात मानसिंगका महाविद्यालयात व्याख्यान
पाचोरा (प्रतिनिधी) :- मराठी भाषा अभिजातच असून तिला २५०० वर्षांपूर्वीचा इतिहास लाभला आहे. शिलालेख, ताम्रपट, अनेक प्राचीन ग्रंथ व त्यावरील संशोधनानुसार मराठीच्या पाऊलखुणा आपणास पहावयास मिळतात. याच्या बळावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. यामुळे आता मराठी भाषा अधिक समृद्ध होऊन संशोधन करण्यासाठी मोठा वाव मिळणार आहे असे प्रतिपादन भडगाव येथील देशमुख महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल देशमुख यांनी केले.
तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित मानसिंगका कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने नुकतेच केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर झाला. (केआरएन)त्याबद्दल ‘मराठी भाषा अभिजातच!’ या विषयावर व्याख्यान व वाङ्मय मंडळाचे उद्घाटन भडगाव येथील देशमुख महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व हिंदी विभागप्रमुख डॉ. जे. व्ही. पाटील हे होते. त्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे साधर्म्य मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख डॉ. वासुदेव वले यांनी केले. मराठी भाषा यापुढे ४५० विद्यापीठातून शिकवली जाणार तर केंद्र सरकारकडून त्यासाठी विशेष अनुदान दिले जाणार म्हणून मराठी भाषा आणखी समृद्ध व्हायला मोठी मदत होईल असे प्रतिपादन केले.(केआरएन) यावेळी कार्यक्रमाला डॉ. शरद पाटील, डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, डॉ. वाय. बी. पुरी, प्रा. राजेश वळवी, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. अतुल पाटील, डॉ. माणिक पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. अमित गायकवाड, डॉ. प्राजक्ता शितोळे, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. वैशाली कोरडे, प्रा. संजिदा शेख, बी. जे. पवार, सुरेंद्र तांबे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. स्वप्नील भोसले यांनी केले.