• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

किरकोळ कारणावरून तरुणावर धारदार शस्त्राने वार, टोळक्याचा मेहरूणमध्ये हैदोस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 14, 2024
in क्राईम, जळगाव
0
किरकोळ कारणावरून तरुणावर धारदार शस्त्राने वार, टोळक्याचा मेहरूणमध्ये हैदोस

तरुणीलादेखील मारहाण, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू

जळगाव (प्रतिनिधी) : शहरात एका हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात इव्हेंटच्या कामासाठी केटर्सची ऑर्डर फिक्स करण्यासाठी नाशिक येथील एक तरुणी जळगावात आली होती. तिला दुचाकीवरुन घेवून जात असलेल्या तरुणाला दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने थांबवित मारहाण केली. तसेच त्याच्यावर धारदार चॉपरसारख्या शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. तरुणीला देखील मारहाण करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शेरा चौकात घडली. तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

शहरातील सम्राट कॉलनीत मुकेश राजेश चव्हाण (वय २७) हा तरुण राहत असून त्याचा इव्हंेट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये कार्यक्रम असल्याने त्याठिकाणी व्हीआयपी केटर्सची आवश्यकता होती. त्यामुळे मुकेश चव्हाण याने नाशिक येथील त्याच्या ओळखीमध्ये असलेल्या एका तरुणीसोबत संपर्क साधून केटरर्स पुरविण्यास सांगितले होते. त्याचे बुकींग करण्यासाठी शनिवारी दुपारच्या सुमारास तरुणी जळगावात आली. यावेळी मुकेश हा त्या तरुणीला घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेला होता. तेथून तरुणीला सोबत घेवून तो एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये बुकींगसाठी जात होता.

दरम्यान, त्या तरुणाच्या दुचाकीचा पाठलाग करीत असलेल्या दोन दुचाकीस्वारांनी त्या तरुणाला काशीनाथ चौफुलीजवळील चौकात थांबवले. त्या तरुणीचे नातेवाईक जळगावात आले असून त्यांच्यासोबत बोलायचे आहे असे सांगून त्याला मेहरूण येथील शेरा चौकात घेवून गेले. शेरा चौकात आल्यानंतर त्याठिकाणी असलेल्या दहा ते बारा जणांच्या टोळक्याने मुकेश याला तरुणीसोबत तुझा काय संबंध, तीला सोबत घेवून कुठे फिरतो आहे या संशयावरुन त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी लोखंडी रॉडसह व चॉपर सारख्या शस्त्राने मुकेशवर वार करुन त्याला गंभीर जखमी केले.

मुकेशला मारहाण केल्यानंतर टोळके तेथून पसार झाले. मुकेशने घटनेची माहिती आपल्या भावासह मित्रांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तरुणाला टोळक्याकडून मारहाण केल्यानंतर त्या टोळक्याने त्या तरुणीला देखील मारहाण केली. दोघांना मारहाण होत असल्यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. दरम्यान, शांतता कमिटीचे दोन सदस्य त्याठिकाणी आले, ते त्या मुलीला सोबत घेवून गेल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.


 

Previous Post

खानदेशात १०० टक्केपेक्षा जास्त पाऊस झाल्याने समाधानाचे वातावरण

Next Post

धक्कादायक, बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धक्कादायक, बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

धक्कादायक, बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
1xbet russia

बँकेमध्ये रांगेत उभ्या असलेल्या वृद्धाच्या पिशवीतून ५० हजार रुपयांचे बंडल महिलांनी चोरले

June 23, 2025
दारुड्या मुलाचा डोक्यात दगड घालून पित्याकडून खून, तीन जणांना अटक
1xbet russia

दारुड्या मुलाचा डोक्यात दगड घालून पित्याकडून खून, तीन जणांना अटक

June 23, 2025
शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू
1xbet russia

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025
समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे
1xbet russia

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

बँकेमध्ये रांगेत उभ्या असलेल्या वृद्धाच्या पिशवीतून ५० हजार रुपयांचे बंडल महिलांनी चोरले

June 23, 2025
दारुड्या मुलाचा डोक्यात दगड घालून पित्याकडून खून, तीन जणांना अटक

दारुड्या मुलाचा डोक्यात दगड घालून पित्याकडून खून, तीन जणांना अटक

June 23, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon