• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

आमदार सुरेश भोळे यांचा महापालिका प्रशासनाला सज्जड दम: ‘कराची वसुली करताना दर्जेदार नागरी सुविधाही पुरवा!’

कचरा संकलनात निष्काळजीपणा करणाऱ्या 'बीव्हीजी' कंपनीवर कारवाईचे थेट निर्देश; महापालिकेत ३.५ तासांची मॅरेथॉन बैठक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2026
in खान्देश, जळगाव
0
आमदार सुरेश भोळे यांचा महापालिका प्रशासनाला सज्जड दम: ‘कराची वसुली करताना दर्जेदार नागरी सुविधाही पुरवा!’

आमदार सुरेश भोळे यांचा महापालिका प्रशासनाला सज्जड दम: ‘कराची वसुली करताना दर्जेदार नागरी सुविधाही पुरवा!’

कचरा संकलनात निष्काळजीपणा करणाऱ्या ‘बीव्हीजी’ कंपनीवर कारवाईचे थेट निर्देश; महापालिकेत ३.५ तासांची मॅरेथॉन बैठक

जळगाव (विशेष प्रतिनिधी): नागरिकांकडून कराची वसुली करताना त्यांना दर्जेदार व वेळेवर नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. केवळ महसूल वसुलीचे उद्दिष्ट न ठेवता सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असा सज्जड दम जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. शहरातील स्वच्छता, कचरा संकलन आणि विविध प्रलंबित नागरी प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी दुपारी तीन ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत महापालिकेत सुमारे साडेतीन तासांची मॅरेथॉन बैठक पार पडली; त्यावेळी ते बोलत होते.

या महत्त्वपूर्ण बैठकीला महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, मनपा आयुक्त आदित्य जिवने, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, धनश्री शिंदे, पंकज गोसावी, संजय राऊत, मुख्य लेखाधिकारी विजयकुमार सोनवणे आणि लेखाधिकारी राजू लाकुडतोडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच कचरा संकलनाचे कंत्राट असलेल्या बीव्हीजी (BVG) कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून कंत्राटदाराची कानउघाडणी

बैठकीत शहरातील अस्वच्छता आणि विस्कळीत कचरा संकलनाच्या समस्येवरून वातावरण तापले. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराने अत्यंत गांभीर्याने पार पाडलीच पाहिजे. बीव्हीजी कंपनीला यापूर्वीही अनेकदा सूचना देऊन समज देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही त्यांच्या कामकाजात अपेक्षित सुधारणा झाली नाही, तर अशा निष्काळजी कंपनीवर थेट दंडात्मक व कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश आमदार भोळे यांनी प्रशासनाला दिले. शहरात नागरिकांना नियमित आणि दर्जेदार स्वच्छता सेवा मिळालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

विभागांमध्ये समन्वयाचे निर्देश

शहरातील मुख्य रस्त्यांवर अडथळा ठरत असलेले विद्युत रोहित्र (DP) आणि विजेचे खांब हलवण्याबाबत महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने परस्परांशी उत्तम समन्वय ठेवून तातडीने मार्ग काढावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. विविध शासकीय विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे विकासाची कामे अडून राहू नयेत आणि त्याचा नाहक त्रास जळगावकरांना सहन करावा लागू नये, याची खबरदारी घेण्याचे निर्देश आमदार भोळे यांनी बैठकीत दिले.

Previous Post

नशिराबादजवळ डंपर-ट्रकची समोरासमोर धडक; चालकाचा मृत्यू

Next Post

जळगावचा घनकचरा प्रकल्प दोन वर्षांपासून रखडला; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावचा घनकचरा प्रकल्प दोन वर्षांपासून रखडला; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

जळगावचा घनकचरा प्रकल्प दोन वर्षांपासून रखडला; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या सहामाहिचे २,६६९.८ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न
खान्देश

जैन इरिगेशनचा ‘सुपरक्रिटिकल’ कंपनीसोबत महत्त्वपूर्ण करार

October 30, 2026
जळगावचा घनकचरा प्रकल्प दोन वर्षांपासून रखडला; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Uncategorized

जळगावचा घनकचरा प्रकल्प दोन वर्षांपासून रखडला; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

October 30, 2026
आमदार सुरेश भोळे यांचा महापालिका प्रशासनाला सज्जड दम: ‘कराची वसुली करताना दर्जेदार नागरी सुविधाही पुरवा!’
खान्देश

आमदार सुरेश भोळे यांचा महापालिका प्रशासनाला सज्जड दम: ‘कराची वसुली करताना दर्जेदार नागरी सुविधाही पुरवा!’

October 30, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
खान्देश

नशिराबादजवळ डंपर-ट्रकची समोरासमोर धडक; चालकाचा मृत्यू

October 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या सहामाहिचे २,६६९.८ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न

जैन इरिगेशनचा ‘सुपरक्रिटिकल’ कंपनीसोबत महत्त्वपूर्ण करार

October 30, 2026
जळगावचा घनकचरा प्रकल्प दोन वर्षांपासून रखडला; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

जळगावचा घनकचरा प्रकल्प दोन वर्षांपासून रखडला; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

October 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!