भजनी मंडळास साहित्य दिल्याबद्दल मानले आभार
धरणगाव (प्रतिनिधी) : धरणगावातील तिळवण तेली समाज बांधवांनी (तलाठी विभाग) आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पाळधी येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी पंच मंडळातील सदस्यांनी भजनी मंडळास साहित्य तसेच समाज मंगल कार्यालयासाठी ५० लाखांचा निधी दिल्याबद्दल गुलाबभाऊंचे आभार मानले.
पाळधी येथील निवासस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची धरणगावातील तिळवण तेली समाज पंच मंडळाने (तेलाठी विभाग) सदिच्छा भेट घेतली. यावेळी सर्वप्रथम पंच मंडळातील सदस्यांनी भजनी मंडळास साहित्य तसेच तेली समाज मंगल कार्यालयासाठी ५० लाखांच्या निधी दिल्याबद्दल गुलाबभाऊंचे आभार मानले. याप्रसंगी समाजाचे अध्यक्ष सुनील चौधरी, उपाध्यक्ष वासुदेव चौधरी तसेच सदस्य संजय चौधरी, विजय सैदाणे, भागवताचार्य मेघनाद बाबा ठाकरे, नामदेव महाराज, गुलाब बाबा, गोपाल चौधरी, सुखदेव चौधरी, भिका चौधरी, बापू मिस्तरी, हेमंत चौधरी, शांतीलाल चौधरी, संजय बिरारी, राजू चौधरी, जितेंद्र चौधरी, शरद चौधरी, कैलास चौधरी, सागर ठाकरे, निलेश चौधरी, भैय्या चौधरी, रोहित चौधरी, अरविंद चौधरी, गोपाल चौधरी तसेच पंच मंडळ व समाज बांधव उपस्थित होते.