नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुक
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी दिनांक २६ जून रोजी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे, असे उपायुक्त (सा.प्र.) विठ्ठल सोनवणे यांनी कळविले आहे. नाशिक शिक्षक मतदार संघासाठी दि. २६ जून रोजी सकाळी ७ ते सायं६ या वेळेत मतदान होणार आहे.