नगराध्यक्ष करण पवार यांनीही बांधले शिवबंधन
जळगाव (प्रतिनिधी) : भाजपामधील कार्यकर्त्यांच्या भावना डावलणे पक्षश्रेष्ठींच्या चांगलेच आले असून आता भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन बुधवारी दि. ३ एप्रिल रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे पक्षात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे. या वेळेला पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी देखील शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे आता भाजपा मध्ये मोठे खिंडार पडले आहे.
यावेळी जळगाव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत,सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे,मनपा माजी विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, ॲड. ललिता पाटील,विराज कावडीया सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.