• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जुन्या भांडणाच्या कारणावरून सालदाराचा झोपेत दगडाने ठेचून खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 30, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

रावेर तालुक्यातील सावदा येथील घटना, दोघांना अटक

रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यात सावदा येथे कोचुर रोडवरील रस्त्याला लागून येत असलेल्या शेतातील खोलीत एका सालदाराची शनिवारी मध्यरात्री दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना सकाळी उघड झाली होती. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासचक्रे फिरवून संशयितांची धरपकड करून त्यांना अटक केली आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी हा खून केल्याचे दिसून आले आहे.

सावदा शहरातील कोचुर रोडवर रविंद्र बेंडाळे याचे शेतात शेत मजुराकरिता बांधलेल्या घरात त्याच्याकडे काम करित असलेला सुभाराम बारेला (वय ४०,रा. आंबळी ता. झिरण्या जि. खरगोन, मध्यप्रदेश) हा राहत होता. आज दि.३० रोजी ०७.३० वाजेच्या सुमारास सुभाराम बारेला हा सकाळी कामावर आला नाही म्हणून शेत मालकाने सुभाराम याची चौकशी केली. तेव्हा शेतातील घरात त्याचे डोक्यात दगड टाकुन त्याचा खुन झाल्याचे आढळुन आले. त्यावरुन लोकेश बेंडाळे याचे फिर्यादीवरुन सावदा पोलीस स्टेशनला अज्ञात गुन्हेगारा विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची माहीती मिळताच तात्काळ घटनास्थळी सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि जालिंदर पळे व पथकाने धाव घेऊन तेथील परिस्थीची पाहणी करुन तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आजुबाजुच्या परीसरातील सालगडी म्हणून काम करणारे सर्व मजुरांची माहीती घेतली. त्यावरुन दोन सालगडी त्याचे कामाचे व राहण्याचे ठीकाणी मिळुन आले नाहीत. त्यावरुन त्याची माहीती घेण्यास सुरवात केली असता त्याने त्याचे मालकाकडून सकाळीच रोजदारीचे पैस घेऊन गेल्याचे समजल्याने चार वेगवेगळी पथक निर्माण करुन रवाना करण्यात आले.

सदरचे संशयित शेत मजुराचे नातेवाईक याचा शोध घेत असताना त्यातील एकाचे नातेवाईक उदळी गावाचे हहीत राहत असल्याचे समजले. त्या ठीकाणी पोलीस पथक गेले व संशयिताना वेगवेगळ्या ठीकाणावरुन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास आणुन त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा दोघांनी गुन्ह्याची कबुली देऊन घडलेली घटना सांगितली. प्रथमदर्शनी केलेल्या चौकशीत मृत व आरोपी याच्यात झालेल्या भांडणाचे कारणावरुन संशयित आरोपी सुकलाल रतन लोहारे (रा.नेपानगर (म.प्र)) व अर्जुन मुन्ना आवासे (रा. बऱ्हाणपुर (म.प्र)) यानी सुभराम बारेला याला झोपेत असताना डोक्यामध्ये दगड टाकुन त्याचा खुन केल्याचे निष्पन झाले आहे. याबाबत गुन्ह्याचे कारणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.

गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर एसपी अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर उपविभाग राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि जालिंदर पळे, पोउपनि अमोल गजें, सफौ संजय देवरे, पोहेको विनोद पाटील, पोहेकॉ यशवंत टहाकळे, पोहेको / देवेंद्र पाटील, पोहेको विनोह तडवी, पोकॉ प्रकाश जोशी, पोकॉ किरण पाटील याचे पथक तयार करुन गुन्ह्याबाबत कोणत्याही प्रकारची माहीती घटनास्थळावर उपलब्ध नसतानाही वरील प्रमाणे त्वरीत हालचाल व चौकशीकरुन चार तासाचे कालावधीत संशयित आरोपीना निष्पन केले व त्याना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. या गुन्ह्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखा कडिल अधिकारी व पो. अंमलदार, अंगुली मुद्रा तंज्ञ, फॉरेन्सिक पथक, श्वान पथक यांनी तपासकामी मदत केली आहे.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/junya-bhandnacya-karnavarun/
Previous Post

रूग्ण अर्ध्यारात्री आला तरी त्याला टाळू नका – पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे

Next Post

विकास पाटील यांची शिवसेनेच्या जिल्हा उपसंघटकपदी निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जुन्या भांडणाच्या कारणावरून सालदाराचा झोपेत दगडाने ठेचून खून

विकास पाटील यांची शिवसेनेच्या जिल्हा उपसंघटकपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026
गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 
1xbet russia

बी.एस्सी. (ऑनर्स) अ‍ॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon