• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नागरीकांच्या सहकार्यामुळे पाचोरा तालुका ग्रीन झोनमध्ये येईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 11, 2020
in जळगाव
0

जळगाव(प्रतिनिधी) – लोकप्रतिनिधींची समन्वयाची भूमिका, तालुका प्रशासनाच्या चांगल्या उपाययोजना व त्यास नागरीकांची भक्कम साथ यामुळे पाचोरा तालुका निश्चितपणे ग्रीन झोनमध्ये येण्यास मदत होईल. अशा आशवाद आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
येथील तहसील कार्यालयात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, डॉ.भूषण मगर, तहसीलदार कैलास चावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, गटविकास अधिकारी श्री. सनेर, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, किशोर बारावकर आदि उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस तहसीलदार चावडे यांनी तालुक्यातील परिस्थितीची माहिती दिली. तर डॉ. समाधान वाघ यांनी कोरोना परिस्थितीची माहिती दिली. पाचोरा येथील रुग्णालयातील अपूर्ण कर्मचारी, तसेच उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी नगरपालिकेला निधीची मागणी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी केली. यावेळी कोरोनावर मात करण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी तालुक्याला उपलब्ध करुन देण्यात येतील असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
पाचोऱ्यात कोरोनाचे रुग्ण आढळताच नागरीकांनी तालुक्यात स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यु पाळल्याबाबत पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांच्यातील समन्वय चांगला आहे. तालुक्यातील प्रत्येक नागरीक हा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना योध्दा म्हणून काम करीत आहे. पोलीसांच्या मदतीला तालुक्यातील 75 पेक्षा अधिक माजी सैनिक मदत करीत आहे. याबद्दल पालकमंत्र्यांनी तालुकावासियांचे कौतुक केले. भडगाव येथे आढावा बैठक संपन्न
पाचोरा येथील बैठक आटोपल्यानंतर पालकमंत्री श्री. पाटील यांनी भडगाव येथेही आढावा बैठक घेतली. कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भडगाव तालुक्यास लागणारी साधनसामुग्री व औषधींची कमतरता भासू देणार नाही. भडगाव येथील लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या समन्वयाने तालुक्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण नाही. याबद्दल पालकमंत्र्यांनी तहसीलदार माधुरी आंधळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे, पोलिस निरीक्षक येरुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत पाटील, सुचिता पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे व पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. त्याचबरोबर भविष्यात तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहण्याच्या सुचना दिल्यात.


 

 

Previous Post

विदेशातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कॉरंटाईन करण्यासाठी नंदनवार यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

Next Post

गावठी आणि देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गावठी आणि देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon