सावदा ( प्रतिनिधी ) – रावेर ते वाघोदा रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनुस इतबार तडवी (वय-३२) रा. वाघोदा बुद्रुक ता. रावेर असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, युनूस तडवी हा आई, पत्नी व दोन मुलांसह रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथे राहायला होता. शेतात केळी मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होतो. रविवारी २३ एप्रिल रोजी युनूस हा दैनंदिन कामाच्या निमित्ताने सायंकाळी ६ वाजता दुचाकी (एमएच १९ बीबी ३९५) ने सासरी वडगाव येथे गेला होतो. तेथून परतत असतांना वाघोदा ते रावेर रस्त्यावर असलेल्या बाळू श्रावण महाजन यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाने युनूसच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत युनूस हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनचालक हा वाहन घेवून पसार झाला. ही बाब युनूसचे काका हमीद हसन तडवी यांनी तातडीने घटनास्थळी गेले असतांना पुतण्याचा मृतदेहपाहून हंबरडा फोडला. रावेर ग्रामीण रूग्णालयात मृतदेह नेण्यात आला. याप्रकरणी हमीद तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाघोदा पोलीस स्टेशनला अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत युनूसच्या पश्चात आई जैनब तडवी, पत्नी काजल आणि दोन मुले असा परिवार आ