• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अट्रावल दंगल : चार फिर्यादी, २०५ आरोपी !

गावात पोलीस बंदोबस्त कायम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 2, 2023
in Uncategorized
0

यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील अट्रावल येथे शनिवारी दोन गटात झालेल्या हाणामारीत सुमारे १०ते १२ जण जखमी झाले होते. या प्रकरणी दोन्ही गटासह शासनाचे वतीने पोलीस उपनिरिक्षक सुनीता मारूती कोळपकर व पोलीस कॉन्स्टेबल अशोक रमेश बाविस्कर अशा वेगवेगळ्या ४ फिर्यादी दाखल झाल्या असून चारही फिर्यादीनुसार तब्बल २o५ आरोपींविरुद्ध विविध कलमासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले आहे.

तालुक्यातील अट्रावल येथे शनिवारी १ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक करत लाठ्या- काठ्याचा वापर करून, तुंबळ हाणामारी झाली होती. यात १० जण जखमी झाले होते. या संदर्भात शनिवारी रात्री उशिरा येथील पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गटाकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात एका गटाकडून ५७ तर दुसऱ्या गटाकडून ५१ जणांवर गुन्हे दाखल झाले.

पोलीस प्रशासनाच्या वतीने फौजदार सुनीता कोळपकर यांनी दिलेल्या फिर्यादीत ९३ व पोलीस कॉन्स्टेबल अशोक बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ०४ अशा चार फिर्यादी दाखल झाल्यात. एकूण ४ फिर्यादीनुसार २०५ आरोपींवर विविध कलमान्वये दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात प्रशासन व दोन्ही गटाकडून दिलेल्या फिर्यादीतील काही संशयित आरोपींची नावे समान आहेत. रविवारी २ एप्रिल रोजी सकाळपर्यंत पंधरा संशयितांना पोलिसांनी अटक केली असून पोलिसांची धरपकड अद्यापही सुरूच आहे.

शनिवारी सायंकाळपर्यंत पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, फैजपूर उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, गुन्हे शाखेचे पो.नि. किसन नजन पाटील हे तळ ठोकून होते. रविवारी पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह फैजपुर सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर, अविनाश दहिफळे यांच्यासह दंगल विरोधी पथक व पोलीस ताफा मोठ्या संख्येने बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता गावात तणावपूर्ण शांतता आहे. नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


 

 

Tags: https://kesariraj.com/atrawal-2a23-n-4/
Previous Post

मविप्र संस्थेच्या संचालकाच्या घराची तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल

Next Post

पतीला मारहाण करून पत्नीच्या अंगावरील दागिने हिसकावले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

पतीला मारहाण करून पत्नीच्या अंगावरील दागिने हिसकावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon