• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिंगायत येथील इसमाची दगडाने ठेचून हत्या ; दोन संशयित ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 22, 2023
in Uncategorized
0

जामनेर तालुक्यात खळबळ

जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पहूर ते जामनेर मार्गावरील सोनाळा रस्त्यावर शिंगाईतच्या व्यक्तीची अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी मद्यपान करून प्रमोद वाघ यांची हत्या करून घटनास्थळावरून पोबारा केल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

 

सोनाळा -पहूर शिव रस्त्यावर पहूर -जामनेर मार्गावर हॉटेल वृंदावननजीक सोनाळा येथील प्रफुल्ल भरत पाटील यांच्या कपाशीच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली शिंगायत येथील प्रमोद उर्फ बाळू वाघ (वय ३७) याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. प्रमोद वाघ सकाळपासूनच घरून निघाला होता. दुपारी जामनेरहून पहूर येथे जातो, असे शालकास फोनवरून सांगितले. शेतकरी प्रफुल्ल पाटील हे सायंकाळी पाचच्या सुमारास शेताकडे गेले असता त्यांना निंबाच्या झाडाखाली दारूच्या बाटल्यांसह ३ ग्लास, पाणी बॉटल आणि अर्धवट खाल्लेला वडापाव आढळून आला. बाजूलाच रक्ताने माखलेला दगड पाहताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. मारेकऱ्यांनी निर्दयपणे प्रमोदच्या डोक्यात दगड टाकल्याने झाडाखाली दगड आणि माती रक्ताने माखली होती. प्रमोदचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह लिंबाच्या झाडापासून शेतात पंधरा ते वीस फूट अंतरावर फरपटत नेऊन टाकून दिल्याचे आढळून आले. शेतकऱ्याने तत्काळ पहूर पोलिसांची संपर्क केला.

 

पोलिस निरीक्षक प्रतापराव इंगळे, जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे, उपनिरीक्षक संजय बनसोड, किरण गर्जे, तालुका समादेशक भगवान पाटील, रवींद्र देशमुख, विनय सानप, ज्ञानेश्वर ढाकरे, गोपाल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली.चाळीसगाव येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरविली. जळगाव येथील न्यायवैद्यक पथकाचे वाघ यांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेले दगड व माती ताब्यात घेतली असून, मयताजवळील मोबाईल फोन मारेकऱ्यांनी लांबविल्याचे समजते. पहूर येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मारेकरी झाले कैद असतील, त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मृत प्रमोद वाघ याच्या मागे पत्नी व मुलगा असा परिवार आहे. मृतदेह विच्छेदनासाठी पहूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.


 

 

Tags: #crime #jalgaon #jamner
Previous Post

संत ज्ञानेश्वर विद्यालयात “वृक्ष संवर्धनाची गुढी” उपक्रम

Next Post

कृषिमंत्री अब्दूल सत्तार यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाने फेकला कापूस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कृषिमंत्री अब्दूल सत्तार यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाने फेकला कापूस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध
1xbet russia

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

February 6, 2026
जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू
1xbet russia

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

February 6, 2026
जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon