
जळगाव (प्रतिनिधी) – येथील मेहरूण परिसरातील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात “वृक्ष संवर्धनाची गुढी” हा उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या हस्ते गुढी उभारून त्यांना वृक्ष संवर्धनासाठी रोपटे वाटप करण्यात आली.



उपक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक सर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयात गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून उपक्रमात सहभाग घेतला. सुरुवातील दोन विद्यार्थ्यांनी गुढीचे पूजन करून शाळेत गुढी उभारली. त्यानंतर वृक्ष संवर्धनासाठी मुलांना वृक्ष वाटप करण्यात आली. प्रसंगी मुलांनी वृक्ष संवर्धन करण्याची शपथ घेतली. उपक्रम संकल्पना संस्थेचे सचिव मुकेश नाईक यांची होती.
पुढील वर्षाची प्रवेश प्रक्रिया विद्यालयात गुढीपाडवापासून सुरु करण्यात येत असून ३१ मार्च पर्यंत प्रवेश घेणाऱ्यास फी मध्ये विशेष सवलत दिली जाणार असल्याचे यावेळी सचिव मुकेश नाईक यांनी सांगितले. सूत्रसंचालन रूपाली आव्हाड यांनी केले. यावेळी मुख्याध्यापिका शीतल कोळी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
