यावल ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील मनवेल येथील वयोवृद्धाने शेतात लिंबाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यशवंत काशीनाथ इंधाटे ( वय – ६५ ) या वयोवृद्ध इसमाने मनवेल शिवारातील प्रविण पाटील यांचा शेतातील बांधावरील निंबाचे झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . या घटनेची खबर बुद्धभुषण मंगल इंधाटे याने दिलेवरून यावल पोलिस स्टेशनला दिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यशवंत इंधाटेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण राग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन देशमुख यांनी केले. मृताच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.