यावल ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथे आदिवासी शेतकर्याने आत्महत्या केली आहे.
याबाबत मिळालेली माहीतीवरून सावखेडासीम येथील युसुफ सुलेमान तडवी (वय ४५ वर्ष राहणार सावखेडा सिम तालुका यावल) यांनी दिनांक ३ नोव्हेबर रोजी सकाळच्या सुमारास सावखेडा सिम शिवारातील शेतावरील बांधावर असलेल्या झाडाला दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली आहे.
या बाबत यावल पोलीस स्टेशनला मयताचे भाऊ मुराद तडवी यांनी खबर दिल्यावरून अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , मयत युसुफ तडवी यांच्या मृतदेहाचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन देशमुख यांनी शवविच्छेदन केलेत. यानंतर त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण , पोलीस नाईक संजय देवरे व राजेन्द्र पवार हे करीत आहे.
दरम्यान, मयत युसुफ सुलेमान तडवी यांच्या कुटुंबात पत्नी, एक मुतगी, एक मुलगा, चार भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.