पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा शहरातील श्रीराम चौकातील एका तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील जामनेर रोडवरील श्रीराम चौक येथे राहत असलेल्या रोहीणी प्रविण मिस्तरी (वय – १८ वर्ष) हिने दि. २२ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी आई, वडिल बाजारात गेले असता घरात एकटीच असतांना घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. सदरची प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली. रोहीणीला तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत रोहिणी हिची प्राण ज्योत मालवली होती. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून रोहिणी हिने आत्महत्या का केली ? या मागील कारण स्पष्ट होवु शकले नसुन पाचोरा पोलिस घटनेचा तपास करीत आहे. रोहिणी हिच्या अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. रोहिणी हिचे पश्चात आई, वडिल, एक भाऊ असा परिवार आहे.