जळगाव (प्रतिनिधी ) – घरात कुणीही नसतांना ४० वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिवाजीनगरातील लाकूडपेठ भागात घडल्याने खळबळ उडाली आहे. संगिता उमेश मोघे (वय-४०)असे मृत विवाहितेचे नाव आहे.
उमेश मोघे हे बळीराम पेठेतील एका खासगी ठिकाणी खासगी नोकरी करीत असून संगिता मोघे यांनी सोमवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसतांना राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी मृत घोषीत केले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पती उमेश मोघे, मुलगी यशीता, देवांश आणि माहिर हे दोन मुले असा परिवार आहे.