जळगाव (प्रतिनिधी ) – शिवकॉलनीमधून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी शिवकॉलनी परिसरात गस्तीवर असतांना (एमएच १९ एलएन ३६०३) क्रमांकाचे ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक करतांना आढळून आले. वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. यासंदर्भात पोलीस नाईका जितेंद्र तावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक विठ्ठल पांडूरंग थोरात रा. सावखेड बुद्रुक जि.जळगाव याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेडकॉस्टेबल विकास महाजन करीत आहे.