मुंबई (प्रतिनिधी ) – राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलेला दिलासा पुन्हा एकदा १६ सप्टेंबरपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे.
पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीला मंदाकिनी खडसे चौकशीत पूर्ण सहकार्य करत आहेत. वेळोवेळी त्यांनी चौकशीसाठी हजेरी लावलेली आहे, अशी माहिती त्यांचे वकील मोहन टेकवडे यांनी कोर्टाला दिली, याची नोंद घेत हायकोर्टानं मंदाकिनी खडसेंना दिलेला अंतरिम दिलासा कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यापुढे सोमवारी मंदाकिनी खडसे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली.