जळगाव ( प्रतिनिधी ) – योगासन प्राणायाम यामुळे शरीर सुदृढ तर राहतेच शिवाय मानसिक ताण तणावही दूर होऊन रक्तदाब मधुमेह यासारख्या आजारांवर याचा प्रभावी परिणाम होतो. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांमध्ये प्राणायाम योगासनांबाबत जनजागृती करावी, असे आवाहन योग प्रशिक्षक सुनिल गुरव यांनी केले. आय.एम. ए तसेच जिल्हा स्त्रीरोगतज्ञ संघटनेतर्फे आयोजित योगासन, प्राणायाम प्रात्यक्षिक कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. राजेश जैन यांच्या फार्म हाऊसवर जागतिक योग दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षक सुनिल गुरव यांनी यावेळी योगासनं बाबत मार्गदर्शन करताना डॉक्टरांकडून प्रात्यक्षिकही करून घेतली. यावेळी त्यांनी योगासनांचे महत्त्व विशद केले. विविध आजारांवर योगासनांचा कसा फायदा होतो, याबाबत त्यांनी माहिती दिली.
डॉ. तिलोत्तमा गाजरे यांनी प्रार्थना व ओंकार सादर केला. सूत्रसंचालन व आभार डॉ. सारिका पाटील यांनी मानले. आयोजित कार्यक्रमात आय. एम. ए. चे सचिव डॉ. जितेंद्र कोल्हे, माजी खा. डॉ. उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील, स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ. सीमा पाटील, सचिव डॉ. दीप्ती पायघन, डॉ.वृषाली पाटील या मान्यवरांसह ७० डॉक्टरांनी सहभाग घेतला.