जळगाव ( प्रतिनिधी ) – प्लॉट विक्रीचे पैसे दिले नाही म्हणून महिलेसह तिच्या लहान भावाला शिवीगाळ व चाकूने वार करत जखमी करणाऱ्या तीन आरोपींवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शबाना शेख सलीम (वय-३५) या न्यू ख्वाजा नगर, पिंप्राळा हुडको येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. त्यांनी त्यांचा प्लॉट विक्री केला होता. याचे पैसे शरिफ शेख याला मागितल्याचा राग येवून १९ मे रोजी सकाळी महिलेसह तिचा भाऊ नईम शेख यांना शिवीगाळ व चाकूने वार करून जखमी केले. आसीफ शेख आणि अहमद शेख ( पुर्ण नाव माहित नाही ) यांनी नईमला मारहाण करून डोक्याला दुखापत केली.
शबाना शेख यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून २० मे रोजी संशयित आरोपी शरिफ शेख, आसिफ शेख आणि अहमद शेख ( पुर्ण नाव माहित नाही ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना विनोद सुर्यवंशी करीत आहेत .